हायलाइट्स:
- सणांवरुन राज्यात राजकीय वातावरण तापले
- सण साजरे करण्याची विरोधी पक्षांची मागणी
- राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा
कल्याणः नागरिकांचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी आहे त्या ऐवजी करोनाविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व मनसेला लगावला होता. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju patil) यांनी उत्तर दिलं आहे.
मनसेनं करोनाचे निर्बंध झुगारुन काल दहीहंडी उत्सव साजरा केला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणांवर निर्बंध आणण्याऱ्या सरकारवही टीका केली होती. त्यानंतर राजू पाटील यांनीही एक ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
… तर हजारो कार्यकर्ते पंचगंगेत जीव देतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
राजू पाटील यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ते म्हणतात, ‘काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की, आंदोलन करायचेच झाले तर ते करोना संपवण्यासाठी करा. अहो आम्ही ते ही करत आहोत. पण वसुली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला?, एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही,’ अशी खोचक टीका राजू पाटील यांनी केली आहे.
‘दुसरी लाट आली तेव्हाच लसीकरणासाठी केंद्र उभारण्यास सुरुवात केली. पालिका आयुक्तांना भेटलो, त्यांना सांगितलं आम्हाला चार- पाच लसीकरण केंद्रे उभारायची आहेत. त्याला परवानगी द्या, तुमच्या लसी येतील, त्या लोकांना मोफत टोचून देऊ. पालिकेचाही खर्च होणार नाही. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ जानेवारीला जो लसीकरणाचा कार्यक्रम चालू झाला आहे. त्यानंतर पालिकेनं अडीच ते पावणे तीन लाख डोस दिले आहेत. रोजची सरासरी काढली तर १५०० आहे. एवढ्या हळूहळू लसीकरण होणार असेल तर पूर्ण कल्याण डोंबिवलीचे लसीकरण व्हायला दोन वर्ष लागतील,’ असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता