नांदेड : अनेकजण आपल्या भन्नाट आयडियाने वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांचा प्रयोग हा कुतूहलाचा विषय ठरतो. नांदेडमध्ये एका उच्च शिक्षित तरुणाने देखील आपल्या भन्नाट आयडियाने एकाच वेळी पेट्रोल आणि चार्जिंग वर धावणारी स्कूटी तयार केली आहे. अवघ्या दीड युनिटमध्ये म्हणजेच १५ रुपयांमध्ये ५० किलोमीटर पर्यंत दुचाकी धावते. उच्च शिक्षित तरुणाच्या या प्रयोगाचा नांदेडमध्ये चर्चेचा विषय ठरत असून स्कूटी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय माधव वसुरे असं या तरुणाचं नाव आहे.
अक्षय वसुरे हा शहरातील बसंतानगर येथील रहिवासी असून त्याचं शिक्षण बी.टेक. इंजिनिअरिंग झालेलं आहे. अक्षयला शिक्षण सुरू असल्यापासूनच वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद होता. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने ई-बाइक तयार करण्याचं त्याने ठरवलं. यासाठी त्याने दोन वर्ष वेगवेगळी माहिती देखील घेतली. हायटेक तंत्रज्ञान वापरून अक्षयने जुन्या स्कूटीवर लिथियम बॅटरी बसवून पेट्रोल प्लस चार्जिंग, अशा दोन्ही प्रकारात चालवता येईल अशी हटके बाइक घरीच तयार केली.

सदरील इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार तासांत पूर्ण चार्ज होते. पूर्ण चार्ज होण्यासाठी दीड युनिट वीज लागते. फुल चार्ज झाली की ४५ ते ५० किलोमीटर ही बाइक धावते. लिथेयम बॅटरी, १.५ किलो वॅटची मोटार, इलेक्ट्रिक कन्व्हर्टर बॅटरी कॅपेसिटी इंडिकेटर, स्विच, वायर आदी साहित्याचा वापर करून ही बाइक तयार करण्यात आली. यासाठी ५७ हजार रुपये खर्च आल्याचे अक्षय वसुरे यांनी सांगितलं.
दिवसेंदिवस वाढणाच्या इंधनाच्या किमती वाढते प्रदूषण व महागाई या समस्या भेडसावणाऱ्या ठरत आहेत. आजच्या काळात पेट्रोल बाइक वापरणे हे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अनेक जन इंधन दरवाढीला वैतागून इलेक्ट्रिक बाइक खरेदीकडे वळत आहेत. त्यातच अक्षयने आपल्या कल्पक बुद्धीतुन तयार केलेली ई – बाईक फायदेशीर ठरणार आहे.