जितेंद्र आव्हाड भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांनी केला खळबळजनक दावा

नाशिकः ‘ठाकरे सरकारच्या ११ खेळाडूंविरोधात चौकशी सुरू झाली आहे. आता १२वा खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आहेत,’ असा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) केला आहे.

किरीट सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली होती. छगन भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला आहे.

वाचाःकिरीट सोमय्यांच्या रडारवर आता छगन भुजबळ; मालमत्तेची केली पाहणी

ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण?, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता किरीट सोमय्यांनी १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहेत, असं म्हटलं आहे. तसंच, आघाडीतील इतर ११ नेत्यांबाबत चौकशी सुरू झाली आहे. पुरावे कारवाई पुढे नेणे ही प्रक्रिया सुरू आहे. तर, अनिल परब व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत कारवाई सुरू झाली आहे, अशी माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

वाचाः ‘ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही’

छगन भुजबळ यांनी संपत्ती जाहीर करावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नामी, बेनामी संपत्ती जाहीर करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. आर्मस्ट्राँग एनर्जी, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर, या कंपनीमध्ये पैसे कुठून आला. यातून जी प्रॉपर्टी आली ती कुठून आली, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

वाचाः ‘संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल’

Source link

Jitendra Awhadkirit somaiya latest newskirit somaiya vs jitendra awhadकिरीट सोमय्याछगन भुजबळछनग भुजबळजितेंद्र आव्हाड
Comments (0)
Add Comment