छगन भुजबळांविरुद्ध पहिला शड्डू, येवल्यातून विधानसभा उमेदवार ठरला, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?

म. टा. वृत्तसेवा, सातपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत येवल्यातून अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात लढणार असल्याची घोषणा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली.

छावा क्रांतिवीर सेनेचा दहावा वर्धापनदिन सोहळा त्र्यंबकेश्वर रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उपनेते सुनील बागूल, आमदार हिरामण खोसकर, माजी महापौर दशरथ पाटील, ॲड. शिवाजी सहाणे, किशोर चव्हाण, विलास पांगारकर, गंगाधर काळकुटे, विलास शिंदे, सतीश सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

करण गायकर म्हणाले, की येणाऱ्या काळात छावा क्रांतिवीर सेना सक्रिय राजकारणात उतरणार आहे. मराठा आरक्षणाबाबत विरोधात भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढणार आहे. त्यासाठी सर्व समाजबांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. आगामी वर्षभरात शेतकरी, कामगार, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न, महिलांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या विरोधात आवाज उठवणार आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जोरदार आंदोलने करणार आहे.
आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा हव्यात; रामदास आठवलेंकडून शिर्डी मतदारसंघावर दावा
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात इंदुबाई सुदाम नागरे यांना (राजकीय क्षेत्र), सुरेश पवार (कृषी क्षेत्र), देवीदास पगार (व्यावसायिक क्षेत्र), गौरव नंदू जाधव व सागर कैलास इरप (बांधकाम क्षेत्र), सागर जारे (युवा रत्न), डॉ. हेमकांत चित्ते (वैद्यकीय क्षेत्र), सुनंदा नितीन गोरे (शैक्षणिक क्षेत्र), रोशन विलास शिंदे (युवा उद्योजक) आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Source link

chhagan bhujbal newsKaran GaikarMaratha Reservationnashik satpurUpcoming assembly elections 2024Upcoming assembly elections in nashikछावा क्रांतिवीर सेना
Comments (0)
Add Comment