हापूसचा यंदाचा हंगाम तीन टप्प्यांत विभागणार;मार्च महिन्यामध्येच सुरू होणार नियमित आंबा हंगाम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्याचा परिणाम आंबा पिकांवर दिसून येत आहे. मात्र थंडीच्या तुलनेत झाडांना मोहर चांगला आला आहे. दिवस आणि रात्रीतील तापमानामध्ये खूप फरक जाणवत आहे. परिणामी, तुडतुडे, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आंबा पिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी सावधगिरी बाळगावी अशी माहिती डॉ. विजय दामोदार, शास्त्रज्ञ, रामेश्वर संशोधन उपकेंद्र, यांनी दिली.