नुकतीच कंपनीने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ३१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि इतर सविस्तर माहिती जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य – कोचीन शिपयार्ड लिमिटेड)
‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
उपव्यवस्थापक विद्युत – ०१ जागा
उपव्यवस्थापक शस्त्रे – ०१ जागा
उपव्यवस्थापक प्रशासन – १ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एमबीए / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर असावा. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३१ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.