या चित्रपटाने सिनेरसिकांच्या फारशा अपेक्षा पुर्ण केलेल्या नाहीत. याशिवाय साऊथकडील सुपरस्टार प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाने खेळ आणखी बिघडवला आहे. यावेळी ‘डंकी’ कोणत्या परिस्थितीतून जात आहे ते जाणून घेऊया.
यावर्षाची सुरुवात शाहरुखने पठाण सिनेमापासून झालेली. या सिनेमाला बॉलिवूडचं ऐतिहासिक यश मिळालं. यानंतर त्याचा ‘जवान’ हा चित्रपट आला. या सिनेमानेही बॉलिवूडचे सर्व रेकॉर्ड मोडण्यात यश मिळविले. या चित्रपटाची कथा आणि शाहरुखरा डबल रोल असलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली. डंकी सिनेमाद्वारे किंग खानने पहिल्यांदाच ‘पीके’, ‘३ इडियट्स’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारखे उत्तम चित्रपट बनवणाऱ्या राजकुमार हिरानीसोबत काम केले होते. बॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण करण्यात चित्रपट अपयशी ठरला. या चित्रपटाने ७ दिवसात जगभरात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
शाहरुखच्या ‘डंकी’च्या कमाईत सातव्या दिवशी घट
शाहरुखच्या ‘डंकी’ची कमाई ७ व्या दिवशी कमी झाली आहे. बुधवारी प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रथमच सिंगल डिजिटमध्ये कमाई केली आहे. पहिल्या बुधवारी ९.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूणच आतापर्यंत १५१.२६ कोटी रुपये कमावले आहेत.
चित्रपटाने जवळपास ३०० कोटींचा आकडा गाठला
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या ७ दिवसांत चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा गाठला आहे. ६ दिवसांत ‘डंकी’ने जगभरात २८३ कोटी रुपये आणि परदेशात ११३ कोटींहून अधिक कमाई केली.
चित्रपटात विकी कौशल आणि तापसी पन्नूची भूमिका
या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशलही यात खास भूमिका साकारताना दिसत आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे.