आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या युवकाचे नाव आहे. सैन्य दलात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या ओंकारने लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. यामुळे जाधव दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास पाहिलेल्या खटावकरांनी ओंकारच्या यशाबद्दल जल्लोष केला. त्याच्या या यशाने अख्खं गाव आनंदून गेलंय.

ओंकार हा पहिल्यापासूनच जिद्दी, अत्यंत शांत, बुद्धिवान आणि शिक्षणाबद्दल त्याला विलक्षण ओढ असलेला म्हणून ओळखला जातो. त्याची शिक्षणातील गोडी पाहून आई-बापानं रात्रंदिवस कष्ट उपसले. जिद्द, चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असेल तर ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल होते. मग तुमची कौटुंबिक परिस्थिती त्याला गौण ठरते हे ओंकारने सिद्ध करून दाखवलं.

जाधव कुटुंबाचा आजही कधी वडिलोपार्जित शेतात, कधी रोजंदारीवर कामाला जाऊन, तर कधी भाजीपाला, फुले विकून उदरनिर्वाह सुरू आहे. ही परिस्थितीची जाणीव ओंकारला असल्यामुळे शिकत शिकत त्याने घराला हातभार लावला. त्याने घरच्या परिस्थितीची, आई-बापाच्या कष्टाची जाण ठेवली. बीएस्सी पदवी घेतली. अभ्यास करत खासगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करून स्वतःचा खर्च भागवला. अनेकदा परीक्षेच्या निमित्ताने ओंकारला इतर राज्यांत जावे लागले. त्यावेळी हॉटेलचे भाडे वाचवण्यासाठी रेल्वे स्टेशनवरच रात्र काढली. पण, सैन्य दलात जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत होता. हे त्याने ज्यावेळी सर्वांसमोर उलगडून सांगितले, त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात दोन मोठे बदल, प्रसिध्द कृष्णा नाही तर या गोलंदाजाला केले संघाबाहेर
ओंकारचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवीनंतर त्याची साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये निवड झाली. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथील वाडिया कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी घेतली. ओंकारच्या डोळ्यासमोर सुरुवातीपासूनच भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. त्याने पदवीच्या पहिल्या वर्षापासून तयारी सुरू केली होती. कष्टमय परिस्थितीशी दोन हात करत ओंकारने काही वेळा तर अपयशाशी झुंजत हे यश संपादन केलं आहे.
रोहित-विराटला खेळायचाय टी-२० वर्ल्डकप, तर BCCI च्या रडारवर ३० भारतीय खेळाडू
पोरांचं आयुष्य खडकाळ माळरानात, दुष्काळाच्या झळा सोसत जाऊ नये म्हणून पडेल ते काम करत होतो. पोरानं चार बुकं शिकून सायब व्हावं, अशी आमची इच्छा होती. त्याला आर्मीची ओढ होती. देशसेवा करण्याचं वेड होतं. त्याचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी पडतील ते कष्ट करण्याची तयारी आम्ही नवरा-बायकोने केली होती. मुलगा लेफ्टनंट झाल्याने आम्हाला कष्टाचं फळ मिळालं आहे, ओंकारचे वडील नानासाहेब जाधव यांनी म्हटलं. एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोटRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Omkar JadhavOmkar Jadhav Success Storysatara latest newssatara newssatara success storyओंकार जाधवओंकार जाधव लेफ्टनंटपदीसातारा ताज्या बातम्यासातारा बातम्या
Comments (0)
Add Comment