OYO चा संस्थापक रितेश अग्रवालनं X वर एक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे की अयोध्येत OYO अॅप युजर्समध्ये ७० टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. ही मोठी वाढ गोवा (५०%) आणि नैनीताल (६०%) सारखे लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या वाढीच्याही पुढे गेली आहे. आपल्या पोस्टमध्ये अग्रवालनं लिहलं आहे की, “धार्मिक स्थळे आता भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत! गोवा (५०%) आणि नैनीताल (६०%) च्या तुलनेत अयोध्येत OYO अॅप युजर्समध्ये ७०% ची वाढ दिसली. धार्मिक पर्यटन पुढील ५ वर्षात पर्यटन उद्योगाचा सर्वात मोठा भाग असेल.”
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी उत्साह वाढण्यासोबतच अयोध्या एक मोठ्या बदलाचा साक्षीदार बनत आहे. १६ जानेवारी, २०२४ ला अभिषेक अनुष्ठानापासून सोहळ्याची सुरुवात होईल, त्यामुळे शहरात पर्यटन देखील वाढत आहे. उत्सुक भक्त २२ जानेवारीला मंदिरात श्री रामाच्या स्थापनेसह समाप्त होणाऱ्या सात दिवसांची ऐतिहासिक प्रक्रिया बघण्यासाठी गर्दी करत आहेत.
शनिवारी, पंतप्रधान मोदींनी महर्षि वाल्मिकी अंतर्राष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करून एक महत्वपूर्ण पाऊल उचलेल, त्यामुळे वाढलेल्या कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक उलाढालीच्या संधी वाढली आहेत. ह्या महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने १५,७०० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी विकास कामांचा शुभारंभ देखील झाला आहे, ज्यामुळे अयोध्येच्या सोयीसुविधांमध्ये आणि पर्यटनात सुधार येईल. त्यासाठी देशातील विविध शहरातून अयोध्याला जाणाऱ्या नवीन ट्रेन्स देखील देखील भारतीय रेल्वेनं सुरु केल्या आहेत, ज्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हातून झालं आहे.