दिवसेंदिवस शाहरुख खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, सहाव्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

मुंबई– तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यापासून गायब असलेल्या शाहरुख खानने यावर्षी तुफान कामगिरी करत धमाकेदार पुनरागम केले. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर नुकताच शाहरुखचा डंकी रिलीज झाला, या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. परंतु मागील चित्रपटांच्या तुलनेत त्याचा हा चित्रपट मागे पडला असला तरी त्याने १०० कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश केला. यावेळी डंकी च्या मार्गात साऊथ सिनेस्टार प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा भक्कमपणे उभा आहे, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने नुसता धुमाकूळ घातला आहे. सहाव्या दिवशी डंकी ने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

डंकीच्या रिलीजनंतर ‘मन्नत’बाहेर गर्दी, किंग खानची फॅन्ससाठी खास सिग्नेचर पोज

शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाची कमाई सहाव्या दिवशी निम्म्याहून कमी झाली आहे. म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती, मात्र मंगळवारी बॉक्स ऑफिसवरची स्थिती थोडी वाईट दिसली. या चित्रपटाला सोमवारी ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदाही मिळाला आणि त्यामुळेच या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.

डंकी ने देशभरात १४० कोटींचा गल्ला पार केला

sacnilk च्या अहवालानुसार, डंकी ने सोमवारी २४.३२ कोटींची कमाई केली होती, तर मंगळवारी चित्रपटाने केवळ १०.२५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण १४०.२० कोटींची कमाई केली आहे.

लहानपणी या अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेला सलमान खान, सायकलने करायचा पाठलाग
विदेशी बॉक्स ऑफिसवरही १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

२१ डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुमारे २७० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने ५ दिवसात जगभरात २५६.०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. शाहरुख खानच्या चित्रपटाने विदेशी बॉक्स ऑफिसवरही १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

मायबोलीत संवाद साधण्याचा प्रयत्न करीन पण… अजिंक्य देव यांनी मराठी प्रेक्षकांना सुनावले खडेबोल
शाहरुख खान सोबत तापसी पन्नू, विकी कौशल

डंकी भारतात ४००० स्क्रीन्सवर रिलीज झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा सिनेमा सुमारे २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला, त्यामुळे सिनेमाने आपल्या मेकिंगची रक्कम वसुल केली असली तरी नफ्यासाठी त्याला झग़डावे लागणार आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी असे अनेक कलाकार आहेत.

Source link

dunki box office collectiondunki movieprabhas moviesalaar movieshah rukh khan movieडंकी बॉक्स ऑफिस कलेक्शनडंकी सिनेमाप्रभासशाहरुख खान सिनेमासालार सिनेमा
Comments (0)
Add Comment