शाहरुखच्या ‘पठाण’ने ५७ कोटींची ओपनिंग केली होती, तर ‘जवान’ने ७५ कोटींची ओपनिंग करून नवा विक्रम केला होता. मात्र ‘डंकी’ या दोन चित्रपटांच्या तुलनेत खूपच मागे पडला आहे. ‘डंकी’ने भारतात बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केवळ २९.२ कोटींची कमाई केली. पहिल्या सोमवारी शुक्रवारपेक्षा जास्त कलेक्शन होते.
‘डंकी’ हा शाहरुख खानचा वर्ष २०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत काम केले होते. सिनेमा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती पण चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तो सरासरी ठरला आहे. सध्या प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटामुळे ‘डंकी’ला नुकसान सहन करावे लागत आहे. शाहरुखच्या ‘डंकी’च्या एक दिवसानंतर ‘सालार’ रिलीज झाला, मात्र अवघ्या ४ दिवसांत या चित्रपटाने २५१.६० कोटींची कमाई केली आहे. तर ‘डंकी’ने ५ दिवसांत केवळ १२८.१३ कोटींची कमाई केली आहे.
शाहरुखच्या ‘डंकी’ने पहिल्या सोमवारी किती कमाई केली?
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या ‘डंकी’ने पहिल्या सोमवारी २२.२० कोटींची कमाई केली, ‘सालार’च्या सोमवारच्या कलेक्शनच्या निम्मे झालेले.
‘डंकी’ने जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली
‘डंकी’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जवळपास २३० कोटींची कमाई केली आहे. ४ दिवसात २०६.०० कोटी रुपये कमावले. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.