नुकतीच याबाबत महाविद्यालय प्रशासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक/ बॉटनी/ झूओलॉजी या विषयातून एमएससी किंवा बीएससी आणि डीएमएलटी किंवा पीजीडीएमएलटी
डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संगणक तज्ञता असावी. तसेच एमएस ऑफिस वर्ड/ एक्सल/ पॉवर पॉइंट आदींचे उत्तम ज्ञान असावे. अधिसूचनेत नमूद केलेल्या निकषानुसार उमेदवार टंकलेखनात पारंगत असावा.
नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बॅक्टेरियोलॉजी लॅब, मायक्रोबायोलॉजी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.