महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून महाराष्ट्र शासनाकडून हा मेळावा घेण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
पालघर येथे होणार्या रोजगार मेळाव्यात पालघर जिल्ह्यातील आणि आसपासच्या अनेक नामांकित कंपन्या रोजगार देण्यासाठी सहभागी होणार आहेत. यामध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवाररांपासून ते पदवीधर आणि अन्य उच्च शिक्षित तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
या मेळाव्यामध्ये विक्री कार्यकारी, क्षेत्र अधिकारी, हॉटेल्समधील प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, उत्पादन अभियंता, गुणवत्ता अभियंता, विक्री समन्वयक, खरेदी व्यवस्थापक या आणि अशा विविध क्षेत्रातील पदांचा समावेश आहे. अंदाजे ०१ हजारांहून अधिक रोजगार या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महास्वयंम’ या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करायची आहे.
या नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. या मेळाव्यात ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ लिंकवर क्लिक करून होम पेज वरील पालघर जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.
नोकरीचे ठिकाण : पालघर
रोजगार मेळाव्याची तारीख : ०४ जानेवारी २०२४
मेळाव्याचे स्थळ : टेमा हॉल, पी- १४, अवध नगर, नवापूर रोड, एमआयडीसी, बोईसर पश्चिम, जिल्हा – पालघर ४०१५०१.