प्रभासच्या ‘सालार’पुढे शाहरुख खानच्या ‘डंकी’ने टेकले गुडघे; तिसऱ्या दिवशी झाली एवढीच कमाई

मुंबई: २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी धमाकेदार ठरले. मात्र वर्षाच्या शेवटी किंग खानला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ सिनेमाच्या आकडेवारीवर शाहरुख किंवा त्याचे चाहतेही नाखूश असतील. शाहरुखने ‘पठाण’ आणि ‘जवान’मधून जी जादू निर्माण केली होती, ती यावेळी ‘डंकी’च्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. ‘जवान’ने पहिल्या दिवशी जितकी कमाई केली होती, तितकी ‘डंकी’ला तीन दिवसातही करता आली नाही. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ने तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी किती कलेक्शन केले, घ्या जाणून.

बॉक्स ऑफिसवर ‘डंकी’ची सुरुवात नक्कीच चांगली झाली होती पण सिनेमा बंपर कमाई करण्यात अपयशी ठरला. पहिल्या वीकेंडलाही चित्रपटाला कमाई करता आली नाही. चित्रपटाच्या कमाईची सुरुवात जरी दुहेरी अंकात झाली असली तरी ‘पठाण’, ‘जवान’ किंवा हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’सारख्या चित्रपटांपेक्षा ‘डंकी’ खूपच मागे आहे. ‘डंकी’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २९.२ कोटींची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने आतापर्यंत १०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

किती आहे तिसऱ्या दिवसाची कमाई?

शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल यांसारे कलाकार असणाऱ्या ‘डंकी’ने तिसऱ्या दिवशी जवळपास २५.५ कोटींचा व्यवसाय केला. शुक्रवारच्या तुलनेत हे आकडे नक्कीच चांगले होते पण समाधानकारक नव्हते. एकूण तीन दिवसांत ‘डंकी’चा ७५ कोटींचा व्यवसाय झाला आहे.

शाहरुखच्या ‘डंकी’समोर असणारं आणखी एक आव्हान म्हणजे प्रभास स्टारर ‘सालार’. या सिनेमाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते आहे. प्रशांत नीलच्या या चित्रपटाच्या तुलनेत ‘डंकी’चा ऑक्युपन्सी रिपोर्ट खूपच सुस्त दिसतो. डंकीच्या मॉर्निंग शोसाठी २१%, दिवसा ३७% आणि रात्री ५५% प्रेक्षकसंख्या पाहायला मिळते आहे.

‘सालार’समोर ‘डंकी’ने टेकले गुडघे

शाहरुख खानचा चित्रपट संथ गतीने कमाई करत असताना प्रभासने मात्र जबरदस्त कमबॅक केले. ‘सालार’ने देशात ९० कोटी रुपयांसह आपले खाते उघडले होते आणि दुसऱ्या दिवशीची कमाई ‘डंकी’च्या दुप्पट होती. sacnilk त्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी ‘सालार’ने ५९.३२ कोटींची कमाई केली आहे. एकंदरित दोनच दिवसात सालारची कमाई १५० कोटींच्या घरात पोहोचली आहे.

कमबॅकपूर्वी शाहरुख खानची होती अशी अवस्था

‘जवान’ आणि ‘पठाण’ सोडले तर त्याआधी शाहरुख खानचा ‘झिरो’ सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झालेला. या सिनेमानेही अपेक्षित कमाई केली नव्हती. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाने देशात ९७ कोटी आणि जगभरात १७८ कोटींचा व्यवसाय केला होता.

Read ENT News And Marathi News

केक कापला, फटाके फोडले; डंकी पाहण्यासाठी शाहरुखच्या फॅन्सची गर्दी

Source link

dunki box office collectiondunki showsshah rukh khan dunkiडंकी सिनेमाशाहरुख खान डंकी
Comments (0)
Add Comment