एएफसीएटी परीक्षा २०२४ :
वर्ष २०२४ च्या हवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा १६, १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतली जाईल. यासाठी अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाली आहे.
कोण अर्ज करू शकते हे जाणून घ्या?
AFCAT मध्ये बसू इच्छिणाऱ्या उमेदवार पदवीधर असणे असणे आवश्यक आहे. तर फ्लाइंग शाखेत प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने विज्ञान शाखेतून किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर, इतर शाखेतील पदवीधरांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर शाखांसाठी पात्रतेचे निकष वेगळे आहेत.
AFCAT परीक्षेचा नमुना :
AFCAT पेपरमध्ये ३०० गुण असतात. दोन तास चालणाऱ्या या परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जाणार असून, जनरल अवेअरनेस, व्हर्बल अॅबिलिटी इन इंग्लिश, न्यूमरिकल अॅबिलिटी, रिझनिंग आणि मिलिटरी अॅप्टिट्यूड टेस्ट या विषयांचा समावेश असतो. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, जे इंग्रजीत विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो.
गुणांचे सामान्यीकरण :
AFCAT परीक्षा अनेक दिवसांत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. परिणामी, परीक्षेत गुणांचे सामान्यीकरण लागू केले जाईल. संख्याशास्त्रीय पद्धतीने उमेदवारांचे गुण मिळविण्यासाठी सामान्यीकरण केले जाते. निकाल जाहीर करण्यापूर्वी विशेष सूत्र वापरून गुण सामान्य केले जातील.