नुकतीच रेल्वे संरक्षण दलाने या भरतीबाबत सध्या प्राथमिक अधिसूचना जाहीर केली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तेव्हा या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘रेल्वे संरक्षण दल भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
कॉन्स्टेबल – २००० जागा
सब इन्स्पेक्टर – २५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २ हजार २५० जागा
शैक्षणिक पात्रता –
कॉन्स्टेबल – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
सब इन्स्पेक्टर – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा.
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.)
वयोमर्यादा –
कॉन्स्टेबल – किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे
सब इन्स्पेक्टर – किमान २० वर्षे आणि कमाल २५ वर्षे
(कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ०३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ०५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अन्य राखीव वर्गांसाठीही काही सवलती नमूद केल्या आहेत. )
निवड प्रक्रिया – चाचणी परीक्षा (Computer Based) आणि शारीरिक योग्यता तपासणी
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय रेल्वे; यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाचे – ही अधिसूचना केवळ भरती जाहीर झाल्या संदर्भात आहे. या भरतीची अर्जप्रक्रिया कधी सुरू होणार, त्याचे सविस्तर तपशील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याची विस्तृत माहिती देणारी अधिसूचना ‘भारतीय रेल्वे’च्या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.