सना खान खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहूच्या मूळ गावातील त्याचा आईच्या घरातून हे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अमित साहूविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याच्या अटकेसाठी ३० डिसेंबर २०२३ रोजी कोर्टाने प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याची आई जबलपूर येथे राहते.मूळ घराची झडती घेतली असता तेथे एक मोबाईल आणि एक लॅपटॉप आढळून आला. मोबाईल आणि लॅपटॉप नेमके कोणाचे होते आणि ते कोणी वापरले?, हे तपासात स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
सना खान हत्याकांडातील मुख्य आरोपी अमित साहूची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ आणि ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याचा निर्णय नागपूर पोलिसांनी घेतला असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरमधून भाजप पदाधिकारी सना खान बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर अमित साहू नावाच्या तिच्या मित्राने तिची हत्या केल्याचे उघड झाले. मात्र अद्यापपर्यंत सना खानचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. सना खानचा मोबाईलही पोलिसांना सापडलेला नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांत नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केल्यानंतर ही महत्त्वाची सूत्रे हाती लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२३ रोजी सना खान जबलपूरला गेली होती, तेव्हापासून ती बेपत्ता होती. जबलपूरचे हॉटेल व्यावसायिक अमित साहू उर्फ पप्पू याच्याशी तिची मैत्री होती. काही लोक तर दोघांचे लग्न झाल्याचा दावा करतात. १ ऑगस्टच्या संध्याकाळी सना खानचा अमित साहूसोबत व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. सना खानने आरोपी अमित साहू याला सोन्याची चेन भेट दिली होती. ती चेन अमित साहू याचा गळ्यात चेन न दिसल्याने संतापलेल्या सना खानने जबलपूरचा रस्ता धरला. जबलपूरला पोहोचल्यानंतर सना खानने दुसऱ्या दिवशी सुखरूप पोहोचल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. पण, त्यानंतर जेव्हा सनाच्या कुटुंबीयांनी तिला फोन केला तेव्हा तिचा फोन बंद होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू याने २ ऑगस्ट रोजी सनाची हत्या करून तिचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिल्याची कबुली दिली होती. त्यानंतर अमित साहूचा मित्र धर्मेंद्र यादव याच्या सांगण्यावरून कमलेश पटेलने सना खानचा मोबाइल फोन नर्मदा नदीत फेकून दिला. या हत्येला पाच महिने उलटूनही सना खानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
Read Latest Maharashtra News And Marathi News