‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम?

मुंबई– ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. ‘सालार’ आता एका दिवसानंतर प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येही त्याने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येही ‘डंकी’ला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे.

उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालावर चाहतीनं मारली चापटी

पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्यासोबतचा प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा २ तास ५५ मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर खिळवून ठेवू शकतो. ‘सालार’ ६ हजार स्क्रीनवर रिलीज झाला असला तरी डंकीच्या तुलनेत त्याच्या शोची संख्या खूपच कमी आहे. शाहरुख खानचा ‘डंकी ‘ ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला असून त्याचे १५ हजारांहून अधिक शो आहेत. तर ६ हजार स्क्रीन्स असूनही ‘सालार’च्या शोची संख्या १२ हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते.

‘सालार’ विरुद्ध ‘डंकी ‘: ॲडव्हान्स बुकिंग

‘सालार’ची अॅडव्हान्स बुकिंग ४८.९४ कोटी रुपये झाली असून त्याची २२,३८,३४६ तिकिटे विकली गेली आहेत. प्रभासचा ‘सालार’ शुक्रवारी पहिल्या दिवशी देशभरात ९५-१०० कोटींची कमाई करू शकतो म्हणजेच पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम रचू शकतो. त्या तुलनेत शाहरुखच्या ‘डंकी ‘ने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे, पण साहजिकच ती ‘सालार’पेक्षा खूपच कमी आहे.

‘सालार’चा बॉक्स ऑफिस अंदाज

sacnilk च्या अहवालानुसार, ‘सालार’ने गुरुवारी रात्रीपर्यंत सुमारे ११ हजार शोच्या मदतीने ४८.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्या तुलनेत ‘डंकी ‘ने १५ शो असूनही पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली. प्रभासच्या याआधी रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून २६.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पहिल्या दिवशी चित्रपटाने देशात ८६.७५ कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत प्रभासचा ‘सालार’ शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नवे रेकॉर्ड बनवू शकतो.

शाहरुखची हॅट्रिक हुकली! पठाण-जवानच्या तुफान यशानंतर ‘डंकी’ने केली निराशा; ‘सालार’ मारणार बाजी?
‘डंकी ‘ विरुद्ध ‘सालार’

‘डंकी ‘ एक दिवस अगोदर रिलीज झाला आणि त्याचे जास्त स्क्रीन्स आणि जास्त शो आहेत. असे असूनही ‘डंकी ‘ने पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, ‘सालार’ रिलीज झाल्याने ‘डंकी ‘च्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. चित्रपट समीक्षकांकडूनही ‘डंकी ‘बाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

‘झिम्मा २’ वर मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण… सिद्धार्थने मानले मराठी सिनेप्रेमींचे आभार
‘सालार’ने ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत, ‘लिओ’ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. अॅडव्हान्स बुकिंगमधून ४६.३६ कोटी रुपये कमावले होते पण ‘सालार’ने यावर्षीचा हा विक्रमही मोडला असून सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

Source link

dunki box office reportprabhas moviesalaar box office reportsalaar movieडंकीप्रभासप्रभास सिनेमाबॉक्स ऑफिस रिपोर्टशाहरुख खान सिनेमासालार सिनेमा
Comments (0)
Add Comment