यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, रवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे.
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे २१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
लिपिक – १२५ जागा
वरिष्ठ लिपिक – ३१ जागा
लघुलेखक निम्न श्रेणी – ०४ जागा
मिश्रक – २७ जागा
शिक्षक – १२ जागा
शिवणकाम निदेशक – १० जागा
सुतारकाम निदेशक – १० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०८ जागा
बेकरी निदेशक – ०४ जागा
ताणाकार – ०६ जागा
विणकाम निदेशक – ०२ जागा
चर्मकला निदेशक -०२ जागा
यंत्रनिदेशक – ०२ जागा
निटींग अँड विव्हिंग निदेशक – ०१ जागा
करवत्या – ०१ जागा
लोहारकाम निदेशक – ०१ जागा
कातारी – ०१ जागा
गृह पर्यवेक्षक – ०१ जागा
पंजा व गालीचा निदेशक – ०१ जागा
ब्रेललिपि निदेशक ०१ जागा
जोडारी – ०१ जागा
प्रिप्रेटरी – ०१ जागा
मिलींग पर्यवेक्षक ०१ जागा
शारिरिक कवायत निदेशक – ०१ जागा
शारिरिक शिक्षक निदेशक- ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २५५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे
वेतन –
लिपिक – १९ हजार ९०० ते ६३ हजार २००
लघुलेखक निम्न श्रेणी – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
मिश्रक – २९ हजार २०० ते ९२ हजार ३००
उर्वरित सर्व पदांसाठी – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र कारागृह विभाग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २१ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.