अनेक चित्रपट असेही होते ज्यांना खूप अपेक्षा होत्या परंतु बॉक्स ऑफिसवर त्यांना यश मिळाले नाही. आता शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ रिलीज होणार आहे. हा चित्रपट २१ डिसेंबर म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होत असून या चित्रपटाचा फटका इतर सिनेमांना पडू लागला आहे. १ डिसेंबरला रिलीज झालेल्या रणबीर आणि विकी कौशलच्या चित्रपटांची मंगळवारी खूपच वाईट अवस्था झाली आहे. आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया.
रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट ओपनिंगच्या बाबतीत या वर्षातील सर्वोत्कृष्ट कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६३.८ कोटींची ओपनिंग असलेल्या या चित्रपटाने नुकतीच बरीच कमाई केली होती. पण १९ व्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. ‘डंकी’ रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची अवस्था फारच बिकट झाली आहे. ‘डंकी’ला आतापासूनच भरपूर बुकिंग मिळत आहे त्यामुळे कुठेतरी ‘अॅनिमल’ची अवस्था बिकट झाली आहे.
संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
sacnilk च्या रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वंगा यांच्या या चित्रपटाने १९ व्या दिवशी केवळ ५.२८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण ५२४.२ कोटींची कमाई केली आहे. जगभरात हा चित्रपट आता ८५० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रणबीर कपूरशिवाय या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत.
‘अॅनिमल’मुळे ‘सॅम बहादूर’ चित्रपटाला झटका
१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ चित्रपटाला ‘अॅनिमल’शी टक्कर सहन करावी लागली, मात्र या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. १९ दिवसांत या चित्रपटाने देशभरात जवळपास ८० कोटींची कमाई केली आहे.
आतापर्यंत सुमारे १०९ कोटी रुपयांची कमाई झाली आहे
देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाने १९ व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी १.५० कोटींची कमाई केली आहे. एकूणच चित्रपटाची कमाई जवळपास ७९.७० कोटी रुपये झाली आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे १०९ कोटींची कमाई केली आहे.