(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
एरंडोल:न.पा.च्या वाढीव हद्दीतील क्षेञाचा विस्तार मोठा असून प्रभाग क्रमांक १ मध्ये पाईपलाईन कुठे ४इंची तर कुठे ३इंची तर कुठे २इंची आहे त्यामुळे नागरीकांना पुरेश्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.
नविन पाईपलाईन साठी निधी मिळावा अशी मागणी येथील प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेवीका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वर्षा राजेंद्र शिंदे यांनी पालकमंञी गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
एरंडोल शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरीकांना होणारा पाणीपुरवठा पुरेश्या प्रमाणात व सुरळीत व्हावा यासाठी नविन जास्त व्यासाची पाईपलाईन च्या विकासकामासाठी जिल्हा नियोजन समिती कडून विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.एरंडोल शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जुनी असल्यामुळे पाणी वितरण योग्य प्रमाणात होत नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.