पोलीस निरीक्षकाचे घर फोडल्याने शहरभर चर्चा
सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अश्विनी भोसले कार्यरत आहेत.सोलापुरातील विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी आश्विनी भोसले यांनी काम केले आहे.सदर बाजार,सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदी अश्विनी भोसले यांनी काम पाहिले आहे. सद्यस्थितीत एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदी अश्विनी भोसले कार्यरत आहेत.सोलापूर शहरात विजापूर रोड परिसरात पाटील नगर येथे राहावयास आहेत.घरगुती कामानिमित्ताने १६ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान मुंबईला गेल्या असता,चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाचे घर फोडले.चोरी होऊन जवळपास आठवडा झाला,परंतु सोलापूर शहर पोलिसांनी माहिती प्रसिद्ध केली नव्हती.ऑनलाइन एफआयआरमुळे सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडल्याची माहिती समोर आली आहे.
सहा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम लंपास
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी १२० ग्रॅम वजनाच्या सहा बांगड्या आणि पस्तीस हजार रुपयांची रोखड घरात ठेवून आजारी आईला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या.बंद घराची रेखी करून संशयित अज्ञात चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेल्या बांगड्या आणि रोखड लंपास केली.मुंबईहून परत आल्यानंतर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या लक्षात आले,अज्ञात चोरट्याने घरातील बांगड्या आणि रोखड लंपास केले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.अधिक तपास पीएसआय गायकवाड करत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News