प्रभू रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो? : आव्हाड

शिर्डी : शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्ष वनवास भोगला होता मग तो शाकाहारी कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिर्डीत शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड बोलत होते.

प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रसार माध्यमांनी आव्हाडांना प्रश्न विचारला असता मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं आव्हाडांनी ठासून सांगितलं. राम क्षत्रिय होता आणि क्षत्रियांचे जेवण मांसाहारी असते. राम मेथीची भाजी खायचा हे कुणी सांगू शकेल का? मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी आणि ते रामभक्त आहे. माणूस कधी मांसाहारी होता आणि कधी शाकाहारी झाला याचा मानवी इतिहास ज्यावेळी खाद्य उगवत नव्हते त्यावेळी लोक काय खायचे? ऋग्वेदामध्ये लिहिलं आहे, वेद वाचा. कुणी कुठल्या मांसाचे भक्ष्यण केलंय स्पष्टपणे कळेल, असं आव्हाड म्हणाले.

राम हा आपला बहुजनांचा, शिकार करून खाणारा, राम शाकाहारी नव्हता | Jitendra Awhad

हिंदू मुस्लीम भिडविण्याचा प्रयत्न

तसेच एक काळ असा होता तुमची ईद तर आमची दिवाळी होती. आता आपण जातो का मुसलमानाच्या घरात? गणेश उत्सव मिरवणूक शांततेत व्हायची आता मात्र गणेश उत्सवात नाचत असताना जर रस्त्यात एखादी मशीद लागली की असं काय अंगामध्ये संचारतं मला काय कळत नाही. परंतु मुसलमानांना माझी विनंती आहे तुम्ही शांत रहा. आपण जर काही ॲक्शन केली तर आपोआप त्याला रिएक्शन येत असते.

एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांचं विधान न पटणारं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगड येथे जे भाषण केलं हे अजिबात पटणार नाही. मुख्यमंत्री असं बोलू शकत नाहीत. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला असं वाटतंय की त्यांच्या तोंडामध्ये ती स्क्रिप्ट कोणीतरी घातली असावी. एकनाथ शिंदे हे केवळ एकनाथ शिंदे नाही तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.

Source link

Jitendra Awhadjitendra awhad on Ram Statementprabhu shri ramprabhu shri ram non vegetarianजितेंद्र आव्हाडप्रभू श्रीराम मांसाहारीशिर्डी राष्ट्रवादी शिबीर
Comments (0)
Add Comment