बेकायदेशीर मोबाइल नेटवर्क बूस्टर वापरणं पडू शकतं महागात; ठाण्यात १८० अँटेना जप्त

वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायजेशन (WMO) नं टेलिकॉम ऑपरेटर्स सोबत मिळून ठाण्यातील विविध भागांमध्ये छापे टाकले. ही कारवाई WMS (DoT) चे डेप्युटी डायरेक्टर प्रकाश सोनकांबळे ह्यांच्या नेतृत्वाखाली २७ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आली. बेकायदेशीर बूस्टर/अँटेना शोधून काढणे हा ह्या छापेमारीचा उद्देश होता. हे बूस्टर बेकायदेशीररीत्या विकले जातात आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर्सच्या नेटवर्क सर्व्हिसमध्ये हस्तक्षेप करतात. WMO च्या ह्या कारवाई दरम्यान ठाण्यातील जीबी रोड येथील अष्टविनायक इलेकट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मधून १८० अँटेना आणि ८९ नेटवर्क बूस्टर जप्त करण्यात आले, जे मुंबईमधील विविध भागांमध्ये बेकायदेशीररीत्या विकले जात होते.

टेलिकॉम ऑपरेटर गेली अनेक वर्ष हा मुद्दा उचलून धरत आहेत. इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट १९४३ नुसार अश्या वाइडबँड सिग्नल बूस्टरचा वापर बेकायदेशीर असून WMO दंडात्मक कारवाई करू शकते.

अश्या डिव्हाइसचा बेकायदेशीर वापर केल्यामुळे सिग्नल इश्यू सुधारण्याऐवजी टेलिकॉम सर्व्हिसचा ऱ्हास होतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर मोबाइल सिग्नल बूस्टर वापरणे म्हणजे बेकायदेशीर वीज किंवा पाणी कनेक्शन घेण्यासारखं आहे, त्यामुळे जे लोक पैसे देऊन सेवा घेतात त्यांच्यावर अन्याय होतो. टेलिकॉम ऑपरेटर स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी बराच खर्च करतात परंतु बुस्टर्समुळे त्यांची गुणवत्ता खालावते.

हे बूस्टर एअरवेव्ह्ज मध्ये हस्तक्षेप करतात आणि त्या परिसरातील ग्राहकांच्या मोबाइल सिग्नलची गुणवत्ता कमी करतात. ह्या डिव्हाइसमुळे कॉल ड्रॉप आणि लो डेटा स्पीड सारख्या नेटवर्क संबधित समस्या देखील उदभवू शकतात. तसेच ग्राहकांची नेटवर्क क्षमता अस्थिर होते, कॉल ड्रॉप येतात, कॉल फेल्युअर, हाय लेटेन्सी आणि इंटरफेरन्स अश्या समस्यांचा सामना देखील ग्राहकांना करावा लागतो.

DoT नं अनेकदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरील सेलर्सना अश्या बूस्टरची विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्याने आलेल्या टेलीकॉम्युनिकेशन अ‍ॅक्ट २०२३ मध्ये देखील कडक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. बेकायदेशीर बूस्टर वापरणाऱ्या लोकांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा किंवा ५० लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते.

Source link

illegal mobile network boostersMobilemobile networkmobile network boostersnetwork boosters
Comments (0)
Add Comment