१० व्या दिवशी म्हणजे रविवार, १० डिसेंबरला ‘अॅनिमल’ आणि सॅम बहादूर यांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली ते जाणून घ्या
‘अॅनिमल’ चे दहाव्या दिवशीचे कलेक्शन
Sacnilk च्या अहवालानुसार, ‘Animal’ ने १० डिसेंबर म्हणजेच दुसऱ्या रविवारी सुमारे ३७ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला. आतापर्यंत सिनेमाने ४३२.२७ कोटींची कमाई केली आहे. असे असून देखील एक मोठा वर्ग ‘अॅनिमल’वर बरीच टीका करत आहे पण कुठेतरी चित्रपटाला कमाईच्या रूपात त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही ‘अॅनिमल’चा व्यवसाय सकाळच्या शोमध्ये ३६.९८ टक्क्यांवरून संध्याकाळच्या शोमध्ये ६४ टक्के आणि रात्रीच्या शोमध्ये ४३.६२ टक्क्यांपर्यंत पोहोचला पाहायला मिळतो.
‘अॅनिमल’ जगभरातील कलेक्शन
‘अॅनिमल’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘अॅनिमल’ने ९ दिवसांत ६६० कोटी रुपयांचे कमाई केली. चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस T-Series ने ग्रॉस कलेक्शन रिपोर्ट शेअर केला होता. रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे बजेट १०० कोटी रुपये होते.
सॅम बहादूर कलेक्शन
विकी कौशल स्टारर ‘सॅम बहादूर’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. ‘अॅनिमल’ सोबत हा चित्रपट १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण या सिनेमाच्या कमाईच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. या १० दिवसांत आतापर्यंत केवळ एकाच दिवशी ‘सॅम बहादूर’ १० कोटींची कमाई करू शकला, अन्यथा त्याला दररोज ६-७ कोटी रुपये कमवण्यासाठीही संघर्ष करावा लागला आहे. दुसऱ्या रविवारी म्हणजेच १० डिसेंबरला ‘सॅम बहादूर’ने ७.५० कोटी रुपये कमवले. आतापर्यंत ‘सॅम बहादूर’ने केवळ ५६.५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट ५५ कोटी रुपये आहे.