सावित्रीबाई फुले नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता : एकनाथ शिंदे

सातारा : थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी खर्चून भव्य स्मारक उभारेल. सावित्रीबाई फुले यांचे कर्तुत्व, त्याग, योगदानाची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंती सोहळा महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषदेतर्फे नायगाव (ता. खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्कमंत्री आणि पालकमंत्री, सातारा व ठाणे जिल्हा शंभूराज देसाई, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री महादेव जानकर, नरेंद्र पाटील, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.

महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देशाला लाभलेले वरदान आहेत. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याने सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहे, अशा शब्दात सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले.

शिंदे म्हणाले, स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे तर सबला आहे, ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. या ठिकाणी त्यांचे स्मारक सुस्थितीत आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली आहे. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. भारतीय नौसेनेतील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. लढाऊ विमाने महिला चालवत आहेत. त्यांचा अभिमान आपल्याला आहे. या सर्वांचे मूळ प्रेरणा स्त्रोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले डोंगराएवढे काम हे आहे. सावित्रीबाई नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता. अन्यायाविरोधात उभे राहायचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचे हे शिकवण त्यांनी दिली. फुले दांपत्य हा आपला अभिमान आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या हजारो पिढ्यांना राहावे यासाठी त्यांचे भिडे वाड्यात मोठे स्मारक उभे करण्यात येत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
विराट कोहलीसाठी आली गुड न्यूज, भारताचा डाव सावरल्याचे मिळाले दमदार बक्षिस
ते म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात लेक लाडकी, जिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी निधी दिला जात आहे. महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग, विक्रीसाठी योजना करत आहे. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी ७२ शासकीय वसतीगृह जानेवारीअखेरपर्यंत सुरू करत आहे.
अदानी हिंडेनबर्गवर ‘सुप्रीम’ फैसला, काँग्रेस आक्रमक, जेपीसी चौकशीवर ठाम!
यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भाषणे झाली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, विभागीय आधी स्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सरपंच साधना नेवसे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, बचत गटातील महिला, नागरिक उपस्थित होते.
गावागावांत दिवाळीपूर्वी ‘राम दिवाळी’, राम मंदिर विषय तापवत ठेवा, भाजपचा लोकसभेसाठी मेगा प्लॅनRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Eknath Shindesavitribai phulesavitribai phule birth anniversaryएकनाथ शिंदेछगन भुजबळसातारा बातम्यासावित्रीबाई फुलेसावित्रीबाई फुले जयंती
Comments (0)
Add Comment