महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri Recruitment 2024: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘संशोधन सहयोगी’ या पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये विविध पाच विभागांचा समावेश आहे/. नुकतीच विद्यापीठाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएचडी धारकांसाठी उत्तम संधी आहे. या भरती करिता ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Sangli DCC Bank Recruitment 2024: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
संशोधन सहयोगी – ०५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०५ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमातून पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी धारक असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन – (मासिक)
पीएचडी धारक उमेदवारांना – ५४ हजार आणि इतर भत्ते
पदव्युत्तर पदवी धारक उमेदवारांना – ४९ हजार आणि इतर भत्ते

वयोमर्यादा –
पुरुषांसाठी कमाल वय ४० वर्षे
महिलांसाठी कमाल वय ४५ वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य, अन्वेषक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जिल्हा – अहमदनगर, राहुरी- ४१३७२२.
(The Principal Investigator, Centre of Excellence on Digital Technologies for Smart and Precision Agriculture (CoE-DTSPA), Deptt. of Agril. Engineering, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri-413722 (MS\, Dist. Ahmednagar )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन म्हणजेच पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri vacancyMPKV Bharti 2024MPKV Recruitment 2024recruitmentमहात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती २०२३
Comments (0)
Add Comment