एरंडोल:तालुक्यात मंगळवारी सर्वञ मुसळधार पावसाने हजेरी लावली तर एरंडोल महसूल मंडळात अतीवृष्टी झाल्याची नोंद तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली.
कासोदा मंडळात ४८ मिलीमीटर,रिंगणगाव-३९मिलीमीटर तर उञाण मंडळात-३५मिलीमीटर याप्रमाणे श्रावणसरी बरसल्या.
दरम्यान पावसामुळे तालुक्यात कुठेही जिवीतहानी व वित्तहानी झाली नसल्याची माहीती तहसिलदार सूचेता चव्हाण व नायब तहसिलदार एस.पी.शिरसाठ यांनी दिली.
कालच्या पावसामुळे अंजनी धरणात ७ टक्के पाणीसाठा वाढला आहे.अंजनी धरणस्थळी ६४मिलीमीटर पाऊस झाला म्हणून धरणात ३७.५३टक्के जलसाठा झाला आहे.
एकूण पाणीसाठा ९.६३ द.ल.घ.मी इतका आहे.
तालुक्यातील नदी,नाले काही प्रमाणात प्रवाहीत झाले आहेत.