नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून यामध्ये ‘कार्यक्रम अधिकारी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, हेल्पलाइन पर्यवेक्षक, संशोधन अधिकारी या पदांच्या एकूण ११ जागांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून ३१ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
कार्यक्रम अधिकारी (युवा केंद्रित प्रकल्प) – ०१ जागा
कार्यक्रम अधिकारी – ०३ जागा
वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी – ०१ जागा
हेल्पलाइन पर्यवेक्षक – ०४ जागा
संशोधन अधिकारी – ०१ जागा
कार्यक्रम अधिकारी (मुले आणि किशोरवयीन केंद्रीत प्रकल्प) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकोलॉजी विषयातून पदवी किंव पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन –
कार्यक्रम अधिकारी (युवा केंद्रित प्रकल्प) – ६३ हजार ते ६५ हजार
कार्यक्रम अधिकारी – ५५ हजार ते ६० हजार
वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी – ७४ हजार ७६ हजार
हेल्पलाइन पर्यवेक्षक – ६० हजार ते ६२ हजार
संशोधन अधिकारी – ५५ हजार ते ६० हजार
कार्यक्रम अधिकारी (मुले आणि किशोरवयीन केंद्रीत प्रकल्प) – ३८ हजार ५००
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल द्वारे
ई-मेल पत्ता – icallhelpline@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.