नवव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चीच हवा, विकीच्या ‘सॅम बहादूर’ला मोठा धक्का

मुंबई– रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका सुरूच आहे. सिनेमाचा दुसऱ्या विकेंडलाही थिएटरमध्ये दबदबा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने ९ दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला. रणबीर कपूर, बॉबी देओल स्टारर या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांच्या जगात इतिहास रचला आहे. ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ नंतर संदीप रेड्डी वंगा यांचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेला विक्की कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट मात्र ‘अ‍ॅनिमल’मुळे चांगलाच हैराण झालेला पाहायला मिळतोय. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवन कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कमी यशस्वी ठरला. ९ दिवसात या दोन चित्रपटांची अवस्था कशी होती ते जाणून घेऊया.

Animal चित्रपटात रश्मिकासमोर भाव खाऊन गेली, कोण आहे तृप्ती डिमरी

‘अ‍ॅनिमल’ने पहिल्या दिवशी ६३.८ कोटींची कमाई केली, हा सिनेमा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे. ‘जवान’ नंतर ‘एनिमल’ने सर्वाधिक कमाई केली आणि मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘अ‍ॅनिमल’ने नवव्या दिवशी ३७.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूणच या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींच्या जवळ मजल मारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३९८.५३ कोटींची कमाई केली.

जगभरात ‘अॅनिमल’ने आतापर्यंत ६३० कोटींहून अधिक कमाई केली

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत ६३० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाने ८ दिवसात ६०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाने ८ दिवसात भारतात ४२९.२० कोटी रुपयांचे कमाई केली. हा चित्रपट देशभरातील सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सुमारे ३ तास २१ मिनिटांच्या रनटाइममुळे चर्चेत राहिला आहे.

‘मी जे काही आहे ते पत्नीमुळेच… वडिलांसारखा बायकोला मुठीत ठेवत नाही’, बॉबी देओलचे वक्तव्य चर्चेत
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मुळे ‘सॅम बहादूर’ला मोठा धक्का

मेघना गुलजार दिग्दर्शित विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर रणबीरच्या ‘अॅनिमल’मुळे त्याच्या कमाईला मोठा फटका बसला आहे. ‘अॅनिमल’ने ६३.८ कोटींची ओपनिंग केली होती, तर ‘सॅम बहादूर’ने पहिल्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली होती. ‘उरी’, ‘सरदार उधम सिंग’ आणि ‘राझी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय कौशल्य दाखवणाऱ्या विकी कौशलने ‘सॅम बहादूर’मध्येही आपली भूमिका चोख बजावली. मात्र, चित्रपटाची कथा कमकुवत असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे तो ‘उरी’ आणि ‘सरदार उधम सिंग’ सारखा यशस्वी झाला नाही. sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने नवव्या दिवशी ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आणि एकूण ४९.०५ कोटी रुपयांची कमाई केली. तर ८ दिवसात जगभरात ५८ कोटींची कमाई केली आहे.

‘ कुर्रर्रर्र…’ नाटकात दिसणार नाही नम्रता संभेराव, म्हणाली- काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय
फातिमा सना शेखने इंदिरा गांधींची भूमिका साकारली

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ हा लष्कराच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे ज्यामध्ये विकी कौशल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत आणि सान्या मल्होत्रा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसत आहे आणि झीशान अयुबही यात दिसत आहे.

Source link

animal moviebox office collectionranbir kapoorsam bahadur movievicky kaushalअॅनिमलबॉक्स ऑफिस कलेक्शनरणबीर कपूरविकी कौशलसॅम बहादूर
Comments (0)
Add Comment