दाऊदचं बालपण गेलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमिनींसाठी लागणार बोली

रत्नागिरी: कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहे.शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत. त्यांचा लिलाव शुक्रवारी होतोय. गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास ११ मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी लिलाव केला आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेतजमिनींचा समावेश आहे.

Dawood Ibrahim News : दाऊद १००० टक्के ठणठणीत, विषबाधेच्या चर्चा निराधार, छोटा शकीलने ‘मृत्यूचर्चे’तील हवा काढली

जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही आठ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबर २०२३ रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.

मुंबईत हप्ते मागून पोलीस कॉन्स्टेबलचा पोरगा झाला डॉन; उभारली ५५,६१० कोटींची ‘D’ कंपनी

भारतातल्या काळ्या कारवायांचं मूळ असलेल्या दाऊदबद्दल अनेक नाना तर्कवितर्क समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कधी त्याच्या वास्तव्याबद्दल तर कधी त्याच्या प्रकृतीबद्दल अशा अनेकदा अफवा समोर आल्या आहेत. त्यानंतर दाऊद चर्चेत राहतो. तीन वर्षांपूर्वी देखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. २०२० साली १.१० कोटीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी लिलावात, बागेतील आंबे नव्या मालकाकडून सर्वसामान्यांना दान!

Source link

dawood ibrahimdawood motherdawood propertykhed newsmumbake villageRatnagiri newsदाऊद इब्राहिम
Comments (0)
Add Comment