चित्रपटातील अत्यंत हिंसक आणि क्रूर दृश्यांमुळे त्यावर टीकाही होत आहे. मात्र असे असूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून तो जोरदार व्यवसाय करत आहे.
‘अॅनिमल’चे ६ व्या दिवशीचे कलेक्शन
‘अॅनिमल’मध्ये अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, प्रेम चोप्रा आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. प्रत्येक पात्र आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झाले आहे. या सर्वात बॉबी देओलची जास्त चर्चा आहे. अनिल कपूरने ‘अॅनिमल’ मधील बॉबी देओलच्या कास्टिंगचे वर्णन ‘मास्टर स्ट्रोक’ असे केले होते. ‘अॅनिमल’ पाहणारे सगळेच प्रेक्षक बॉबी देओलचे कौतुक करत आहेत.
१ डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘अॅनिमल’ने ६३.८ कोटी रुपयांची ब्लॉकबस्टर ओपनिंग केली होती, अशातच आता पहिल्या सोमवारची यशस्वी घोडदौड झाल्यानंतर ‘अॅनिमल’च्या कमाईत सातत्याने घसरण होत आहे.
६ दिवसात भारतात ३१२.९६ कोटी रुपयांची कमाई केली
Sacnilk च्या अहवालानुसार, सहाव्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबरला ‘अॅनिमल’ने ३० कोटी रुपये जमा केले, जे पाचव्या दिवसापेक्षा कमी आहे. पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या मंगळवारी या चित्रपटाची कमाई ३७.४७ कोटी रुपये होती. अशाप्रकारे ‘अॅनिमल’ने सहा दिवसांत देशभरात ३१२.९६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘अॅनिमल’च्या ऑक्युपेंसीबद्दल बोलायचे झाल्यास, ६ डिसेंबर रोजी सकाळच्या शोमध्ये २३.०७%, दुपारच्या शोमध्ये ३१.०६% आणि संध्याकाळच्या शोमध्ये ३६.६५% होते. तर, रात्रीच्या शोमध्ये ४८.७४% व्याप्ती होती.
‘अॅनिमल’चे जगभरातील कलेक्शन
‘अॅनिमल’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, सहा दिवसांत ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाने अवघ्या चार दिवसांत ४२५ कोटींची कमाई केली होती.