Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची लीक किंमत
लीकनुसार भारतात Vivo X100 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर Vivo X100 Pro फक्त एका स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होऊ शकतो. विवो एक्स१०० डिवाइसचा १२जीबी रॅम +२५६जीबी मॉडेल ६३,९९९ रुपये आणि १६जीबी रॅम +५१२जीबी स्टोरेज ६९,९९९ रुपयांमध्ये एंट्री करू शकतो. तर विवो एक्स१०० प्रो च्या १६जीबी रॅम +५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९९९ रुपये असेल. ही एमओपी आहे आणि एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस थोड़ी जास्त असू शकते.
Vivo X100 आणि Vivo X100 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X100 आणि Vivo X100 Pro फोन्समध्ये ६.७८-इंचाचा LTPO अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात १.५के पिक्सल रेजोल्यूशन, २०:९ अॅस्पेक्ट रेशियो, एचडीआर१०+, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३००० निट्स पीक ब्राइटनेस आणि २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट मिळत आहे. दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९३०० चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी इम्मोर्टलिस-जी७२० जीपीयू आहे. जोडीला १६जीबी पर्यंत रॅम +५१२जीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज मिळेल.
Vivo X100 मध्ये OIS आणि LED फ्लॅशसह ५०एमपीचा प्रायमरी सेन्सर, ५०एमपीचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि ६४एमपीची टेलीफोटो मॅक्रो लेन्स आहे. X100 Pro मध्ये OIS आणि LED फ्लॅशसह ५०एमपीचा मुख्य सेन्सर, ५०एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि ५०एमपी टेलीफोटो कॅमेरा मिळेल. तसेच ह्यात एक खास व्ही ३ इमेजिंग चिप पण आहे. दोन्ही फोन्समध्ये सेल्फीसाठी ३२एमपीचा कॅमेरा आहे.
दोन्ही फोन्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, स्टीरियो स्पिकर, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी६८ रेटिंग आणि हाय-फाय ऑडियो टेक्नॉलॉजी सारखे अनेक फीचर्स मिळत आहेत. Vivo X100 मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंगसह ५,०००एमएएचची बॅटरी आहे तर Vivo X100 Pro १००वॉट फास्ट चार्जिंग, ५०वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगसह ५,४००एमएएचची बॅटरी मिळते.