रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ समोर फिका पडला विक्की कौशलचा ‘सॅम बहादूर’; पहिल्या दिवशी केवळ इतकीच कमाई

मुंबई : १ डिसेंबरला एकाच दिवशी रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ आणि विक्की कौशलचा ‘सॅम बहादूर’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. संदीर रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी ६१ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर वर्ल्ड वाइड सिनेमाचं १०० कोटी कलेक्शन झालं असल्याची माहिती आहे. ‘ॲनिमल’ने ‘पठाण’, ‘गदर २’ आणि ‘टायगर ३’ चा रेकॉर्ड मोडला आहे. ६१ कोटी ओपनिंगसह ‘ॲनिमल’ हा रणबीर कपूरच्या करिअरमधील पहिला हायेस्ट ओपनर सिनेमा ठरला आहे.

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ सिनेमासह विक्की कौशलचा ‘सॅम बहादूर’ सिनेमा क्लॅश झाला. दोन्ही सिनेमे १ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित झाले. विक्की कौशलच्या ‘सॅम बहादूर’ सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण रणबीरच्या ‘ॲनिमल’पुढे विक्कीचा ‘सॅम बहादूर’ फिका पडला आहे.

‘ॲनिमल’ सिनेमाला पहिल्याच दिवशी मोठा फटका, काही तासांतच चित्रपट ऑनलाइन लीक
‘सॅम बहादूर’ सिनेमाचं ओपनिंग संथ झालं. सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी ‘सॅम बहादूर’ दोन आकडी कलेक्शनही करू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर विक्की कौशलच्या ‘सॅम बहादूर’ सिनेमाने पहिल्या दिवशी ५.५० कोटींचा गल्ला जमवला. ओपनिंगला सिनेमाला फार कमाई करता आली नाही, परंतु वीकेंडला सिनेमा चांगली कमाई करू शकेल असा अंदाज निर्मात्यांनी वर्तवला आहे.

‘तारक मेहता’मध्ये होणार दयाबेनची एन्ट्री? जेठालाल-चंपक चाचाने दिलं उत्तर, नवा प्रोमो चर्चेत
‘ॲनिमल’चं ॲडव्हान्स बुकिंग

‘ॲनिमल’चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर या सिनेमाची मोठी क्रेझ निर्माण झाली होती. त्यामुळेच सिनेमाचं मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ३३ कोटींहून अधिकचं कलेक्शन केलं होतं.

आमचं ब्रेकअप झालं तेव्हा…. बॉलिवूड अभिनेत्रीचा इरफान पठाणबाबत धक्कादायक दावा, वर्ल्डकपवेळी शमीला केलेलं प्रपोज
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ६१ कोटींची कमाई केली. ‘ॲनिमल’ने ‘पठाण’, ‘गदर २’, ‘टायगर ३’ लाही मागे टाकलं. ‘पठाण’ने ५७ कोटी, ‘गदर २’ ने ४०.१० कोटी आणि ‘टायगर ३’ ने ४४.५० कोटी पहिल्या दिवशी कलेक्शन केलं होतं.

सलमान खानसोबत केमिस्ट्री, टायगर ३ चित्रपट; इमरान हाशमीने आठवणी सांगितल्या

‘ॲनिमल’ सिनेमाने पहिल्याच दिवशी हिंदीत ५० कोटी, तेलुगूमध्ये १० कोटी कमावले आहेत. तमिळमध्ये ०.४ कोटी, कन्नडमध्ये ०.०९ कोटी आणि मल्याळममध्ये ०.०१ कोटींचं कलेक्शन केलं आहे.

Source link

animalanimal box office collection day 1sam bahadursam bahadur box office collection day 1सॅम बहादूर बॉक्स ऑफिस कलेक्शनॲनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment