पोको एक्स ६ सीरीज फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यापूर्वी पोको इंडियाचे प्रमुख Himanshu Tandon ह्यांनी ही टीज केली होती. त्यांनी लिहिलं होतं की Happy Xmas, सांता लवकरच गिफ्ट घेऊन येत आहे. त्यांच्या ह्या ट्विटनं स्मार्टफोन लाइनअप ह्या महिन्याच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला येईल, असं सुचवलं आहे. कंपनीनं टीजरमध्ये भारतीय अष्टपैलू क्रिकेटर Hardik Pandya झळकला आहे.
Poco X6 मध्ये असे असू शकतात फीचर्स
आतापर्यंत आलेल्या लीक्सनुसार, आगामी पोको एक्स ६ स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ असेल. ह्यात Snapdragon 7s Gen 2 चिपसेट दिली जाईल. त्याचबरोबर डिव्हाइसमध्ये १६जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज मिळू शकते. फोटो क्लिक करण्यासाठी डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, तर सेल्फीसाठी १६एमपीचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
पोको एक्स ६ ची बॅटरी ५१००एमएएचची असेल, जी फास्ट चार्जिंगसह मिळेल. तसेच, फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ड्युअल सिम, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल.
संभाव्य किंमत
अलीकडेच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोको एक्स ६ ची किंमत १५ ते २० हजारांच्या आत ठेवली जाऊ शकते. तसेच ह्याच्या प्रो व्हेरिएंट पोको एक्स ६ प्रो २० ते २५ हजार रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. फोन्सच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सची किंमत वेगवेगळी असेल. ह्या सीरीजच्या डिवाइसची खरी किंमत लाँच इव्हेंट नंतर मिळेल.