महाराष्ट्र शासनाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्गातील तब्बल ३४५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ३४५ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :
पुरवठा निरीक्षक, गट-क
कोकण : ४७ जागा
पुणे : ८२ जागा
नाशिक : ४९ जागा
छत्रपती संभाजीनगर : ८८ जागा
अमरावती : ३५ जागा
नागपूर : २३ जागा
उच्चस्तर लिपिक, गट-क
वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई : २१ जागा
आवश्यक पात्रता :
१. या जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पडवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
३. पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणार्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
४. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.
५. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
(अधिक माहिती आणि सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
मिळणार एवढा पगार :
ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असून यासाठी उमेदवाराला दरमहा खालील प्रमाणे पगार दिला जाणार आहे.
- पुरवठा निरीक्षक, गट-क : S-१० प्रमाणे रुपये २९,२०० ते ९२,३०० + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
- उच्चस्तर लिपिक, गट-क : S-८ प्रमाणे रुपये २५,५०० ते ८१,१०० + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
अशी असणार निवड प्रक्रिया :
- या प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ३८ वर्षापर्यंत असावे.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
- भरती प्रक्रियेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या सर्व विषयांची मिळून २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे, यासाठी उमेदवाराला कमीत कमी ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्काविषयी :
० या परीक्षेसाठी अराखीव प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.
० उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
० MSCIT प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षात ते सादर करणे बंधनकारक राहील.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
– उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईनऑनलाइन पद्धतीनेच खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
– उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
– दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
– अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
– उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.