नुकतीच याबाबत बँकेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १२ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पद, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘बँक ऑफ इंडिया रायगड झोनल शाखा भरती २०२४’ मधील पदे आणि इतर तपशील –
पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक
पदसंख्या – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
नोकरी ठिकाण – रायगड झोनल शाखा (RSETI)
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रायगड विभागीय कार्यालय,आर्थिक समावेशन विभाग, दुसरा मजला, हॉटेल मीरामाधव बिल्डिंग, एस. टी. स्टँड समोर, अलिबाग, जिल्हा – रायगड, ४०२२०१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.