‘महावितरण’च्या हिंगोली केंद्राने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ११ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच ऑनलाइन अर्जानंतर प्रत्यक्ष छणणी होऊन निवड केली जाईल. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदाचे नाव – अप्रेंटीस/ शिकाऊ प्रशिक्षणार्थी
वीजतंत्री विभाग – ४० जागा
तारतंत्री विभाग – ४० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण – हिंगोली
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२४
या भरतीसंदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने शासनाच्या ‘अप्रेंटीसशिप इंडिया’ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ११ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची मूळ आणि छायांकित प्रत घेऊन उमेदवारांनी १५ जानेवारी रोजी अर्ज पडताळणी साठी विद्युत भवन मंडळ कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणार्या उमेदवारांचाच विचार केला जाईल.