नुकतीच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून याद्वारे एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया ३० डिसेंबर रोजी होणार आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
तासिका तत्वावरील प्राध्यापक (CHB)
इकनॉमिक्स – ०२ जागा
अकाउंटन्सी – ०६ जागा
इंग्लिश – ०१ जागा
एनवायरमेंटल सायन्स – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १० जागा
शैक्षणिक पात्रता –
इकनॉमिक्स – अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.A.- Eco.), नेट/सेट/ पीएचडी
अकाउंटन्सी – कॉमर्स विषयात पदव्युत्तर पदवी (M.Com. -Accounts) नेट/सेट/ पीएचडी
इंग्लिश – इंग्लिश विषयात पदव्युत्तर पदवी (M.A. English) नेट/सेट/ पीएचडी
एनवायरमेंटल सायन्स – संबधित विषयात पदव्युत्तर पदवी (M. Sc. -Env. Science) नेट/सेट/ पीएचडी
नोकरी ठिकाण – सांगली
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता – ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली
मुलाखतीची तारीख – ३० डिसेंबर २०२३
मुलाखतीची वेळ – सकाळी ११ वाजता
या भरतीसंदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. उमेदवारांनी संबधित वेळेच्या आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.