नुकतीच ‘एचएससीएल’ने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ३१ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.
‘हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
(कार्यक्षेत्र – सिव्हिल. इलेक्ट्रिकल, फायनान्स, एचआरएम, लॉ)
व्यवस्थापक – १६ जागा
उप व्यवस्थापक – २० जागा
सहाय्यक व्यवस्थापक -०९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित फील्ड मधील अभियांत्रिकी पदवी पात्र किंवा इतर पदांनुसार संबधित विषयात पदवीधर असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पत्रात अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतनश्रेणी –
व्यवस्थापक – ६० हजार ते १ लाख ८० हजार
उप व्यवस्थापक – ५० हजार ते १ लाख ६० हजार
सहाय्यक व्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार
वयोमर्यादा – (कमाल)
व्यवस्थापक – ३७ वर्षे
उप. व्यवस्थापक – ३३ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – ३० वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३१ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.