राष्ट्रवादीवर पलटवार; अनिल देशमुखांच्या जावयाच्या अटकेबाबत दरेकर म्हणाले….

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादीकडून अटकेबाबत प्रश्नचिन्ह
  • प्रवीण दरेकरांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
  • राणे प्रकरणाचीही करून दिली आठवण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला बुधवारी अटक करण्यात आली होती. या अटकेच्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच ही कारवाई बेकायदेशीरपणे झाल्याचा आरोपही केला आहे. राष्ट्रवादीच्या या आरोपांना भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे

अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक तुम्ही करता, पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिकजी, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…’, असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे.

Anil Deshmukh Case: अनिल देशमुख प्रकरणाला धक्कादायक वळण; जावयाला CBIने सोडले, पण…

नेमका काय होता राष्ट्रवादीचा आरोप

‘संध्याकाळी अनिल देशमुखजी यांच्या कन्या, सून त्यांचे जावई व वकील वरळी निवासस्थानातून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. तसंच देशमुख यांच्या जावई आणि वकिलांना १०-१२ लोकांनी ताब्यात घेऊन सोबत नेले. कुठलीही माहिती मुलीला किंवा कुटुंबातील महिलांना देण्यात आली नाही,’ असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.

‘एकंदरीत ही सगळी कारवाई बेकायदेशीर व कुठलेही नियम किंवा प्रक्रियेला धरून नाही. प्रश्न निर्माण होत आहे की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की राज्यकर्त्यांचा नवीन कायदा या देशात लागू झालेला आहे, याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे,’ अशी मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

Source link

anil deshmukhPravin Darekarअनिल देशमुखनवाब मलिकप्रविण दरेकर
Comments (0)
Add Comment