वृश्चिक राशीचे 2024 साठीचे करिअरबद्दलचे राशीभविष्य
वृश्चिक राशीसाठी 2024 हे वर्ष करिअर आणि व्यापार यासाठी ठिकठाक राहाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी यांच्यात ताळमेळ ठेवताना अडचणी येतील. जास्तीचे काम, तसेच केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळत नसल्याने नैराश्य येईल. त्यामुळे अत्यंत चिकाटीने या परिस्थितीवर मात करावी लागणार आहे. तुमचे विरोधक आणि शत्रूही अधिक सक्रीय झालेले असतील, त्यामुळे फसगत होणार नाही, असे पाहा. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक वाटचाल करा. या वर्षी अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूक करा, अन्यथा पैसे अडकून पडतील. घाईगडबडीत कोणाताही निर्णय घेऊ नका. जर व्यावसायिक विस्तार करणार असाल तर हा निर्णय मे महिन्यानंतर घ्या, किंवा या वर्षी अशा योजना टाळलेल्या बऱ्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल. तसचे शिक्षण, परीक्षा यात यश मिळेल. वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात चांगेल यश आणि संधी मिळेल.
वृश्चिक राशीचे 2024 साठीचे प्रेम आणि कुटुंबासंबंधीचे राशीभविष्य
हे वर्ष तुमच्यासाठी प्रेम आणि नातेसंबंध यासाठी फारसे अनुकूल नाही. पण मे महिन्यानंतर थोडी परिस्थिती सुधारेल, तसेच घरात एखादे मंगलकार्य घडेल. विवाहयोग्य व्यक्ती वैवाहिक जीवनात प्रवेश करतील. संतानप्राप्तीचे वेध लागतील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुमचा कंटक शनी घरातील ज्येष्ठांसाठी प्रतिकूल आहे. प्रेमजीवनात फार संयम बाळगावा लागेल, अन्यथा ब्रेकअपपर्यंत प्रकरण जाईल. आईवडिलांची सेवा करावी, त्यांचे आशीर्वाद शुभ आणि लाभदायक ठरतील.
वृश्चिक राशीसाठी 2024 चे आरोग्यविषयक राशीभविष्य :
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या वर्षी आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. तुमच्या राशीत चतुर्थस्थानी शनी आहे, त्यामुळे अपघात, मार लागणे अशा घटना घडतील, तर याबाबती सतर्क राहावे. राहू तुमच्या राशीत पंचम होऊन येत आहे, त्यामुळे हृदय आणि छातीच्या आजारांची शंका वाटते. नियमित योग, ध्यान आणि प्राणायाम तुमच्यासाठी लाभकारक ठरतील.
वृश्चिक राशीसाठी 2024 च्या उपाययोजना
उपाय म्हणून या वर्षी राहूचा मंत्र ‘ओम रां राहवे नमः’ आणि शनीचा मंत्र ‘ओम शं शनैश्चरायै नमः’ चा नियमित जप करावा. सोमवारी मूळा दान करावा. रुद्राक्ष धारण करण्याची इच्छा असेल तर सातमुखी रुद्राक्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.