बिग बजेट सिनेमांनाही टाकलं मागे, ३० कोटींची कमाई करणाऱ्या‘ट्वेल्थ फेल’चं बजेट किती होतं माहित्येय?

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडला चांगले दिवस आले आहेत. बिग बजेट सिनेमांसोबतच कमी बजेट असलेल्या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. असाच एक सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय. ट्वेल्थ फेल असं या सिनेमाचं नाव आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं तुफान कमाई केली.
देवानं दिलेलं सगळ्यात भारी गिफ्ट…राघव यांना परिणितीच्या शुभेच्छा; बर्थडेच्या दिवशी शेअर केले खास फोटो
ना कोणता सुपरस्टार नाही, कोणताही भव्य सेट नाही, कोणतंही लाऊड म्युझिक नाही; पण तरीही हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीनं या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. हा सिनेमा आयपीएस मनोजकुमार शर्मा यांचा बायोपिक असला तरी तो खेडेगावात असूनही उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व करतो.

बजेट किती?
अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतलेला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ट्वेल्थ फेल या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर २० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात १०० कोटींच्यावर बजेट असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अतिशय निराशाजनक कामगिरी केली. त्या तुलनेत ट्वेल्थ फेल सिनेमानं चांगली कमाई केली आहे.
नाळ २ मधली चिमी जिंकतेय प्रेक्षकांचं मन, चिमुकलीच्या ऑडिशनचा आहे भन्नाट किस्सा

मोठ्या सिनेमांना टक्कर
ट्वेल्थ फेल या सिनेमानं कंगना रणौत हिच्या तेजस सिनेमालाही मागं टाकलं आहे. तर रिलीजनंतर या सिनेमानं ‘लियो’ सिनेमापेक्षाही अधिक कमाई केली आहे. ट्वेल्थ फेल सिनेमानं पंधराव्या दिवशी १.२५ कोटींची कमाई केलं. तर सिनेमाची एकूण कमाई ३० कोटींच्या घरात आहे.

विक्रांत मेस्सी म्हणतो की,
‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाबद्दल विक्रांत म्हणतो की, ‘एका दिवशी अचानक विधू विनोद चोप्रा यांच्या ऑफिसमधून फोन आला. ते ‘ट्वेल्थ फेल’ची निर्मिती करणार आहेत हे माहीत होतं. नंतर कळलं, की या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा तेच करणार आहेत. त्यामुळं नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, ते वाचून काढलं. ही कथा प्रेरणादायी असून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मनोमन वाटलं. म्हणून हा चित्रपट करायच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.’

Source link

12th fail box office collection12th fail budget12th fail movie12th fail movie box office collection12th fail movie budgetthalapathy vijay leo filmट्वेल्थ फेलविक्रांत मेस्सी
Comments (0)
Add Comment