नुकतीच संस्थेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती ०३ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था’ (MSIHMCT) भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या –
विजिटिंग फॅकल्टी – हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील संबधित ११ विषयांचे प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार ‘AICTE’ च्या निकषानुसार संबधित अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. विस्तृत माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता – प्राचार्य कार्यालय, महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था, शिवाजी नगर, पुणे
मुलाखतीची तारीख – ०३ जानेवारी २०२३
मुलाखतीची वेळ – सकाळी १०.३० वाजता
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया ३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून उमेदवारांनी संबधित वेळेच्या आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.