अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूल येथे भरती; आजच करा अर्ज

Army Public School Ahmednagar Recruitment 2024: शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर काम करण्याची संधी अहमदनगर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची भरती केली जाणार आहेत. नुकतीच या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण, प्रशिक्षणार्थी शिक्षक., मुख्याध्यापिका, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, क्रियाकलाप शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल, मुख्य लिपिक, निम्न विभाग लिपिक(LDC), प्रशासकीय पर्यवेक्षक, रिसेप्शनिस्ट, संगणक लॅब अटेंडंट, सायन्स लॅब अटेंडंट, एटीएल लॅब सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर अशा अनेक पदांचा समावेश आहे.

या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २२ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता. वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर भरती २०२४’ मधील पदे –
दव्युत्तर पदवी शिक्षण, प्रशिक्षणार्थी शिक्षक., मुख्याध्यापिका, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, क्रियाकलाप शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल, मुख्य लिपिक, निम्न विभाग लिपिक(LDC), प्रशासकीय पर्यवेक्षक, रिसेप्शनिस्ट, संगणक लॅब अटेंडंट, सायन्स लॅब अटेंडंट, एटीएल लॅब सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याची पदनिहाय विस्तृत माहिती अधिसूचनेत दिली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर अँड स्कूल, अहमदनगर – ४१४००२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
– २२ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २२ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Army Public School Ahmednagar Recruitment 2024Army Public School Recruitment 2024indian army recruitment 2024recruitmentआर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती २०२४आर्मी पब्लिक स्कूल भरती २०२४
Comments (0)
Add Comment