शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, १४ व्या दिवशी सर्वाधिक कमी कमाईची नोंद

मुंबई– शाहरुख खानचा चित्रपट ‘डंकी’ २०२४ मध्ये ‘सालार’सोबत दाखल झाला असला तरी आता त्याची क्रेझ झपाट्याने कमी होत आहे. शाहरुख खानला करिअरमध्ये पहिल्यांदाच राजकुमार हिरानीसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि ‘डंकी’ तयार झाला. शाहरुखने २०२३ मध्ये एकत्र तीन चित्रपट केले, त्यापैकी ‘डंकी’ शेवटचा रिलीज झाला होता. शाहरुखचा डंकी सालारच्या तुलनेत मागे पडला असला तरी गेल्या वर्षी सर्वाधित कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये त्याचा समावेश झाला आहे.

शाहरुखच्या डंकीचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

किंग खानच्या या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. मात्र, राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सहभागी झाला आहे. बुधवारी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर काय परिस्थिती होती ते जाणून घेऊ.

शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाला प्रभासच्या ‘सालार’शी संघर्ष करावा लागत आहे. या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानने हॅटट्रिक केली असली तरी आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे.

Ex पत्नी किरण रावसोबत कॉफी विथ करण ८ मध्ये येणार आमिर खान,घटस्फोटावर सोडतील का मौन?
‘डंकी’च्या कमाईत झपाट्याने घट

sacnilk च्या अहवालानुसार, या चित्रपटाने १ जानेवारी रोजी चांगली कमाई केली होती, त्यादिवशी सुमारे ९.०५ कोटी रुपये कमावले होते. १३ व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत ५७.४६ % घसरण नोंदवली गेली आणि त्या दिवशी केवळ ३.८५ कोटींच कमाई झाली. बुधवारची आकडेवारी अधिक आश्चर्यकारक होती. या चित्रपटाने १४ व्या दिवशी केवळ ३.३० कोटींची कमाई केली.

राणी मुखर्जीच्या मुलीला तिचा कोणता सिनेमा आवडतो? म्हणाली- मला चित्रपटात रडताना पाहू शकत नाही अदिरा
‘डंकी’ची जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सिनेमाने ४०३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने १३ दिवसांत जगभरात ४००.७५ कोटी रुपयांची कमाई केली, तर विदेशी बॉक्स ऑफिसवर १६०.७५ कोटी रुपये कमावले. १३ दिवसांत भारतात २४०.७५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

हा चित्रपट परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ५ मित्रांची कथा दाखवली आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल आणि सुनील ग्रोवर यांच्याही भूमिका आहेत.

Source link

dunki box office collectiondunki moviesalaar movieshah rukh khanshah rukh khan newsडंकी बॉक्स ऑफिस कलेक्शनडंकी सिनेमाशाहरुख कानशाहरुख खान सिनेमासालार सिनेमा
Comments (0)
Add Comment