अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दाव्यानंतर बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभा लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. विद्यमान खासदार नवनीत रवी राणा यांना लढायचे असल्यास त्यांनी प्रहारच्या तिकीटावर लढावे असे कडू म्हणाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती लोकसभेवर त्यांचे वडील माजी खासदार आनंदराव अडसूळ लढणार असल्याचा दावा केला होता. यानंतर आता प्रहारचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवर दावा केला आहे. अमरावती लोकसभेसाठी प्रहार इच्छूक आहे. महायुतीत प्रहारला ही जागा सुटावी असे त्यांनी म्हटले आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा या जागेसाठी इच्छूक आहेत. परंतु त्यांनी प्रहारच्या कोट्यातून ही निवडणूक लढवावी असे सांगत प्रहार व स्वाभिमानी यांनी संयुक्तरित्या ही निवडणूक लढविली पाहिजे असेही ते म्हणाले. आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या घटनेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत प्रवेश केला होता. सध्या बच्चू कडू महायुतीत सहभागी आहेत. अशातच त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

विधानसभेच्या १५ जागा हव्या : बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेच्या अमरावती, अकोलासह अन्य एक अशा तीन जागा तर विधानसभेच्या १५ जागांवर दावा केला आहे. महायुतीमध्ये घटक पक्ष असल्याने आम्हास या जागा देण्यात याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आगामी १५ जानेवारीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

महायुतीचा धर्म पाळा : रवी राणा

आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा केल्यानंतर युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे. महायुतीमध्ये असल्याने आमदार बच्चू कडू यांनी युतीचा धर्म पाळावा. वाकडे चालाल तर सरळ करू असे थेट आव्हानही त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले आहे. अमरावती लोकसभेच्या दाव्यानंतर फारसे सख्य नसणाऱ्या आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. खासदार नवनीत राणा या महायुतीत असल्याने बच्चू कडू यांचा त्यांना पाठिंबा राहील असे आपण गृहीत धरत आहोत. तर आमदार कडू यांनीदेखील त्यांच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघात त्यांना आमचा पाठिंबा राहील असे गृहीत धरावे असे म्हटले आहे.

मंत्री १० मिनिटांनी येणार, ही ग्रामपंचायत आहे का? बच्चू कडू सभागृहातच भडकले

Source link

2024 loksabha electionAmravati newsbachhu kadubjpNavneet RanaShivsenaअमरावती न्यूजनवनीत राणाबच्चू कडूरवी राणा
Comments (0)
Add Comment