दिखावा करण्यात भारतीय सर्वात पुढे! न परवडणारे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यात भारतीय प्रथम

महागड्या स्मार्टफोन बाबत बोलायचं झालं तर भारत ह्या लिस्टमध्ये सर्वात वर आहे. तसे पाहायला गेलं तर हा सर्व खेळ दिखाव्याचा आहे. सध्या स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे हे मान्य आहे. परंतु भारतात स्मार्टफोनकडे एक स्टेट्स सिंबल म्हणून पाहिलं जातं. म्हणून सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत जगात १४२व्या क्रमांकावर असलेला आपला देश महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याच्या बाबतीत सर्वात वेगानं पुढे जात आहे.

दिखाव्यासाठी स्मार्टफोनची खरेदी?

चीन, भारत, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये प्रीमियम स्मार्टफोनची विक्री सर्वाधिक आहे. परंतु भारत ह्यात सर्वात पुढे आहे, जिथे एक नवीन रेकॉर्ड पाहायला मिळाला आहे. भारत जागतिक स्थरावर जलद गतीनं वाढत असलेला प्रीमियम स्मार्टफोन मार्केट आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील स्मार्टफोन सेलमधील सर्वाधिक खरेदी ईएमआयवर केली जात आहे.

भारताचे दरडोई उत्पन्न अंगोला सारखे देशापेक्षा देखील कमी आहे. अंगोला देशात दरडोई उत्पन्न ३२०५ डॉलर आहे, तर भारतात दरडोई उत्पन्न २६०१ डॉलर पेक्षा जास्त आहे. तर अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ८०,०३५ डॉलर आहे. सध्या प्रीमियम स्मार्टफोनच्या बाबतीत भारतात अ‍ॅप्पलला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. अ‍ॅप्पलचा भारताच्या प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंट मधील मार्केट शेयर सुमारे २५ टक्के आहे.

महागड्या फोन्सच्या बाबतीत अ‍ॅप्पल पुढे

काउंटर पॉईंटच्या रिपोर्टनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतातील प्रीमियम स्मार्टफोन मार्केट वेगानं वाढलं आहे. प्रीमियम स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर वर्ष २०२३ मध्ये जगभरात सर्वात जास्त प्रीमियम स्मार्टफोन सेलच्या बाबतीत अ‍ॅप्पल पुढे आहे, परंतु अ‍ॅप्पलच्या मार्केट शेयरमध्ये घसरण झाली आली आहे.

२०२२ मध्ये अ‍ॅप्पलचा मार्केट शेयर ७५ टक्के होता जो २०२३ मध्ये कमी होऊन ७१ टक्के झाला आहे. अ‍ॅप्पलचा मार्केट शेयरमध्ये कमी होण्यामागे हुआवे मेट ६० स्मार्टफोन सीरीज कारण असल्याचं म्हटलं जात आहे. ग्लोबली प्रीमियम स्मार्टफोन मार्केट शेयर मध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अ‍ॅप्पल नंतर सॅमसंग दुसरा सर्वात जास्त विकला जाणारा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड आहे. सॅमसंगचा मार्केट शेयर सुमारे १७ टक्के आहे, जो गेल्या वर्षांपर्यंत १६ टक्के होता.

Source link

appleiPhonepremium smartphone market in indiaईएमआयप्रीमियम स्मार्टफोनमहागडे फोन
Comments (0)
Add Comment