कुठल्या देवाच्या मंदिरात मांसाहार चालतो? जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, राम कदम आक्रमक

मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भगवान श्रीराम “मांसाहारी” असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी राम कदम हे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाडांना अटक करण्याची मागणी राम कदमांनी केली आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात आंदोलन सुरु केले असून पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला.

श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची त्यांची मानसिकता आहे. मात्र मतं गोळा करण्यासाठी ते हिंदू धर्माची चेष्टा करु शकत नाहीत. राम मंदिर बांधले गेले आहे ही वस्तुस्थिती ‘घमंडी’ आघाडीला पटलेली नाही, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.

हा देशभरातील रामभक्त, साधूसंत, महंत यांचा आक्रोश आहे. हा घमंडी आघाडीच्या विरोधातील आक्रोश आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी हे मिळून करत आहेत. कुठल्या मंदिरात मांसाहार चालतो? प्रसाद म्हणून कुठे मांसाहार चढवला जातो? जर देवतांना मांसाहार प्रिय असता, तर मांसाहार प्रसादात दिला असता. घरी साधी पूजा जरी असेल, तरी मांसाहार करणारं घर त्यादिवशी शाकाहार करतं, चार मित्र मंदिरात जात असतील, आणि एकाने मांसाहार केला असेल, तर तो थांबतो देवळाबाहेर. हे जितेंद्र आव्हाडांना चांगलं माहिती आहे. तरीदेखील हिंदूंच्या भावना दुखवायच्या आणि कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या भावना खुश करायच्या, यासाठी हे पेटी पॉलिटिक्स आहे, असं राम कदम म्हणाले.

पुण्यात पोलीस निरीक्षकाच्या मुलीचा सोसायटीत राडा, हातात दगड घेत महिलांच्या अंगावर धाव

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्ष वनवास भोगला होता मग तो शाकाहारी कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिर्डीत शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड बोलत होते.

रवींद्र धंगेकर खासदार तर सोडाच पण पुन्हा आमदारही होणार नाही; भाजपच्या धीरज घाटेंची जळजळीत टीका
राम क्षत्रिय होता आणि क्षत्रियांचे जेवण मांसाहारी असते. राम मेथीची भाजी खायचा हे कुणी सांगू शकेल का? मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी आणि ते रामभक्त आहे. माणूस कधी मांसाहारी होता आणि कधी शाकाहारी झाला याचा मानवी इतिहास ज्यावेळी खाद्य उगवत नव्हते त्यावेळी लोक काय खायचे? ऋग्वेदामध्ये लिहिलं आहे, वेद वाचा. कुणी कुठल्या मांसाचे भक्ष्यण केलंय स्पष्टपणे कळेल, असं आव्हाड म्हणाले.

२४ तासांत जितेंद्र आव्हांडावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन महाआरती करु : आनंद परांजपे

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Jitendra Awhadjitendra awhad lord ram eat meatram kadamजितेंद्र आव्हाडजितेंद्र आव्हाड भगवान राम मांसाहारभगवान श्रीराम मांसाहारराम कदमराम मंदिर अयोध्या
Comments (0)
Add Comment