आता शाळेत पहिलीपासूनच मिळणार कृषीविषयक धडे; शालेय शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Agriculture Subject In The School Syllabus : नव्या शैक्षणिक धोरणा अंतर्गत शिक्षण विभागात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. आता या बदलांच्या यादीत एक महत्त्वाच्या विषयाची भर पडली आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे; अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना केसरकर यांनी ही घोषणा केली केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषीचे धडे दिले जाणार असल्याचेही त्यांनी संगितले.

कृषी शिक्षण अनिवार्य :

निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे.

शिक्षकांनाही मिळणार कृषी शिक्षण :
आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Maharashtra School Timing Change : महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार; आता ‘या’ वेळेत भरणार दुसरीपर्यंतचे वर्ग

Source link

agriculture subject in the school syllabuseducation newseducational newsnew education policyकृषी शिक्षणनवीन शैक्षणिक धोरणशालेय विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणशालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर
Comments (0)
Add Comment